जिल्हाधिकारी करणार मार्गदर्शन
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर दि जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने ड्रीम फौंडेशन ,ड्रीम टूर्स अँड ट्रॅव्हल्स व बसव संगम शेतकरी गट तर्फे बुधवार दि 27 सप्टेंबर 2023 रोजी सोलापुरातील पर्यटन संधी व जबाबदारी यावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आले असल्याचे संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी कळविले आहे.
रंगभवन येथील समाजकल्याण केंद्र येथे सकाळी 9,30 वा मा जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे,सोलापूर मध्ये मोठया प्रमाणात लोक पर्यटन साठी येतात त्यांना चांगली सेवा द्यावेत धार्मिक व कृषी पर्यटन वाढावेत यासाठी काय करावेत वर मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अस्मिता गायकवाड,विश्वनाथ चाकोते,राजेंद्र हजारे ,दीपक आर्वे,सुनील ठेंगील व कुमार करजगी उपस्थित राहणार आहेत,या कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पर्यटन केंद्र संचालक यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यामध्ये राजू भांडरकवठेकर अभिषेक मळा,राजेंद्र सुरवसे,श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम,सुधीर जाधव वनाप्रस्थ कृषी पर्यटन केंद्र,विजयकुमार सिंगी,सिंगी मळा,परमेश्वर शरणार्थी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र,मीना शहा,सुग्रास फार्म,मधुर बजाज पिकनिक पॉईंट,सुनील बाबानागरे,वळसंगवाडा, संगप्पा केरके,श्री संगमेश्वर मंदिर सुधारणा समिती हत्तरसंग कुडल,उषा हंचाटे योग शिक्षिका यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.