पंढरपूर प्रतिनिधी
नेता व्हावा ऐसा गोंडा ,त्याचा तिन्ही लोकी झेंडा ...!
आजकाल तरुणाई नेत्याच्या लहान लहान गोष्टीसाठी हात पसरते मात्र आपला नेता मोठा व्हावा , आपल्या नेत्यांची स्वप्न पूर्ण करावीत , त्यांच्या हातून जनहिताची काम व्हावी, यासाठी आपल्या भक्तीद्वारे देवाने आपली शक्ती आपल्या नेत्याच्या पाठीशी उभी करावी, यासाठी सदैव प्रयत्न करणारा एक अवलिया भक्त अन निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणजे श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश ननवरे.
महाराष्ट्रातील युवकांचे आयडॉल, तरुणाईच्या गळ्यातील ताईत, आपला कार्यकर्ता, सहकारी, जनता सदैव चांगली राहिली पाहिजे , सहकऱ्यांच्या सदैव पाठीशी सह्याद्रीप्रमाणे उभा राहणारे व्यक्तिमत्व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे कर्तृत्ववान आ. सत्यजित तांबे यांचा बुधवारी वाढदिवस होता.
बा..! विठ्ठला माझा नेता पदवीधर मतदार संघातून आमदार होऊ दे, तुझ्या चरणी ११ किलो पेढे त्यांच्या वाढदिवशी वाटप करीन..! असा भाव विठ्ठलाच्या चरणी गणेश ननवरे यांनी निवडणुकीपूर्वी व्यक्त केला होता. अन वैकुंठाचा मालक बा विठ्ठल गणेशाला पावला. सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार झाले.
गणेशरावांनी विठ्ठलाच्या चरणी केलेला नवस त्यांच्या वाढदिवशी पूर्ण केला..! नेत्यासाठी सर्वांचं तोंड गोड करणाऱ्या गणेशरावांनी बुधवारी आगळावेगळया वाढदिवसाच्या शुभेच्छा नेत्याला दिल्या.
धन्य तो नेता अन धन्य तो कार्यकर्ता ..