पंढरपूर प्रतिनिधी
मयत नामे रामचंद्र विजयकुमार बागडे वय ४८ वर्षे रा. उमदे गल्ली, पंढरपूर हे दि. २९/०८/२०२३ रोजी सकाळी १०/०० वाचे सुमारास सुवासिनी दुध डेअरी जवळ सोलापूरे नगर लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर येथील महेश कुलकर्णी यांचे मालकिचे गाळयाच्या शटरसमोर परशीवर बेशुध्द अवस्थेत उताणे स्थितीत पडलेला दिसला. त्यावेळी त्याचे डोळयातून रक्त आल्याचे दिसून येत होते.
त्यावेळी हजर असणारे गजानन इटकर, पोलीस पाटील, मयताचे नातेवाईक श्रीपाद पांडुरंग शहाणे व सुहास श्रीपाद शहाणे असे सर्वानी मिळुन त्यास उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचाराकरीता घेवून गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर सदर मयताचे नक्की मरणचे कारण समजण्याकरीता सदर मयताचे पी. एम. करण्यात आले. मा. वैद्यकिय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर यांनी सदर पी. एम. केलेनंतर मयत नामे रामचंद्र विजयकुमार बागडे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने मयत झाल्याचा अभिप्राय दिला आहे.
सदर मयताचे बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे अकस्मात मयत नं.८०/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.