सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व राजराजेश्वरी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेला आनंद कुरापाटी या माजी विद्यार्थ्यांचा सोनी हिंदी लाईव्ह चॅनेलवर प्रक्षेपण होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.त्याने साडेबारा लाख रुपयांची कमाई केली.
आनंद हा कामगार वसाहतीत रहाणारा युवक असून स्वतः शाळेचे कपडे शिवण्याचे काम करत गेल्या चार वर्षांपासून कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत होता. शेवटी गेल्या आठवड्यातील 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' गटातून निवड झाली.अखेर भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. आनंदचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलाखतीतून कौटुंबिक व सोलापूर शहरासंबधी चर्चा झाली. प्रश्नावलीद्वारे शक्य होईल तेवढे उत्तर दिल्याची कबुली आनंद याने गुरुवारी निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होता. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते आनंद कुरापाटी याचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सोमवार दि.२८ ऑगस्ट रोजी रात्री ९.०० वाजता सोनी हिंदी लाईव्ह चॅनेलवर प्रक्षेपण होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रम पहावे असे आवाहन मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके यांनी केले आहे.