पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज ग्रामीण जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, जिल्हा वुशू संघटना यांचे संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
प्रारंभी संस्थेचे जेष्ठ संचालक अनिरुद्ध भाऊ सालविठ्ठल,प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजीत शिनगारे,वुशू संघटनेचे युवराज गायकवाड,जाधवर सर,श्रीकांत चंदनशिवे ,देडे सर, गणेश पाटील, या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
क्रीडा विभाग, क्रीडा संघटना, आरोग्य विभागातील उपस्थित मान्यवर यांच्या सत्कारानंतर मैदानावर वुशू शो मॅच संपन्न झाली.
कार्यक्रमाची अध्यक्षीय निवड जेष्ठ शिक्षक सुरेश कट्टे यांनी केली. त्यास अनुमोदन श्रीकांत चंदनशिवे यांनी दिले.सुत्रसंचालन जैनुउद्दीन शेख तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.
सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.सदर स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या.
स्पर्धेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी कोच महादेव शेरीकर यांनी परिश्रम घेतले.