शिर्डी येथे लोककलावंतांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधि
राज्यातील विविध लोककला सादर शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा दिवसरात्र प्रचार प्रसार करून उपजीविका भागविनारे लोककलावन्त आज शासनाच्या उदासीन व नाकर्ते धोरणामुळे बेरोजगार होऊन हवालदील झालेले आहेत आता हक्क हे मागून मिळत नाहीत ते झगडून घ्यावे लागतात त्यासाठी संघर्ष करण्यासाठी एकजुट व्हावे लागेल असे मत लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष शाहिर सम्राट सुभाषदादा गोरे यांनी शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय लोककलावंत कार्यशाळेत व्यक्त केले.
भारत सरकारच्या सॉन्ग व ड्रामा विभाग अंतर्गत रजिस्टर्ड व माहिती संचालनालय अंतर्गत नोंदनीकृत कलासंचाची शासन नोंदनीकृत राज्यव्यापी शिखर संस्था संघठन लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान अंतर्गत लोककलावंत प्रबोधन परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय एक दिवशीय चिंतन धोरण दिशादर्शन कार्यशाला 25 ऑगस्ट 2023 रोजी श्रीक्षेत्र शिर्डी येथील धर्मशाला क्र 2 येथे संपन्न झाली.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य अध्यक्ष शाहिर सम्राट सुभाष दादा गोरे(सांगली) होते तर सचिव शाहिर बालासाहेब मालुस्कर(पुणे), उपाध्यक्ष शाहीरा सत्यभामा आवले (पुणे), निमन्त्रक तथा प्रवक्ता शाहिर उत्तम गायकर,(नाशिक) संचालक शाहिर नानाभाऊ परिहार, शाहिर बाबुसिंग राठोड़, (जालना),सुनीताताई खरात( बुलडाणा)मिनाताई कांड़ेकर,(बीड) विनोद ढगे(जळगाव),रूपेश ठाकुर,(संभाजी नगर) सुशील सहारे(चंद्रपुर) शाहिर रमेश गिरी(नांदेड़),शाहिर उबाले (परभणी),शाहिर प्रकाश दांडेकर(हिंगोली) राज्यसमन्वयक तथा परिषद कोषाध्यक्ष गजेंद्र गवई(बुलडाणा), कविनन्द गायकवाड़(वाशिम) भीमराव तायड़े(अकोला) कल्पनाताई माली(सातारा), शाहीरा मिराताई उमप, शाहिर सुरेश जाधव,शाहिर धुमाल (संभाजी नगर ) विजय व्यवहारे (पंढरपूर) यांचे सह महाराष्ट्रातील सम्पूर्ण 36 ही जिल्ह्यातील शाहीर लोककलावन्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला उपस्थित सर्व लोककलावन्त यांचे कार्य परिचय सत्र घेण्यात आले.
सदर कार्यशालेत शाहिर बालासाहेब मालुस्कर यांनी लोककलावन्त प्रबोधन परिषद, ध्येय,उद्देश्य व पुढील वाटचाल,शाहीरा सत्यभामा आवले यांनी लोककलावंताची दैनीय अवस्था, आजारपन,आर्थिक परिस्थिति,शासनाचे उदासीन धोरण, शाहिर विनोद ढगे यांनी दशा व दिशा,लोककलवंत सुशील सहारे यांनी संघठना बांधनी चे धोरण याविषयी , सत्र निहाय विषय मांडणी केली.
सदर कार्यशालेत उपस्थित जेष्ठ व वयोवृद्ध कलावंत , उपस्थित सर्व महिला कलावंत यांचा परिषदेचे वतीने विशेष सन्मान केला.
याप्रसंगी जिल्हा ,तालुका निहाय समन्वयक, अध्यक्ष, संघटक यांना नियुक्ति पत्र देऊन सन्मान केला.
लोककलावंत प्रबोधन परिषद म रा चे राज्य समन्वयक यांनी संघठना बांधनी करताना जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी,ग्राम शाखा कार्यकारणी बांधनी करून राज्य ते गाव असे नेटवर्क उभे करून त्यांचे भूमिका व जबाबदारी व कार्य याबाबत सविस्तर विवेचन केले.
कार्यशाळेचे बहारदार सूत्रसंचालन गजेंद्र गवई यांनी केले तर आभार बालासाहेब मालुस्कर यांनी मानले.
कार्यशालेसाठी सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यातुन 36 ही जिल्ह्याचे लोककलावंत शाहीर, महिला कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते.