मायणी प्रतिनिधी
दहिवडी ता.माण येथे माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक सिद्धनाथ मंगल कार्यालय दहिवडी येथे सातारा जिल्हा कॉग्रेस कमिटी अंतर्गत व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली .
यावेळी मायणी (शिंदेवाडी) ता.खटाव येथील सुनिल भिसे यांची सातारा जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती प्रवर्गातील खटाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले .
या कार्यक्रमावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे निरिक्षक प्रदेश उपाध्यक्ष मा . मोहन जोशी,आमदार रविंद्र धंगेकर,मा.धवलसिंह मोहिते - पाटील,मा.श्रीरंग बारणे, मा.उदयसिंह पाटील,मा.राजेंद्र शेलार,भानुदास माळी,मा. अल्पनाताई यादव,मा.जाकिर पठाण,मा.जगन्नाथ कुंभार,डॉ.सचिन सुर्यवंशी, मा प्रतापसिंह देशमुख,मा. नरेश देसाई,अखिल भारतीय कॉग्रेस कमिटी सदस्य मा.रणजीतसिंह देशमुख,सातारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अमरजित कांबळे,जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, अनुसुचित जाती विभाग सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष संजय तडाखे,उपाध्यक्ष राहुल काळुंखे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनिल भिसे यांनी सांगीतले,कॉग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे.त्याला प्रयत्नाची जोड देऊन या माध्यमातून तरुणांसाठी काम करणार असून तरुणांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करणार.
सदर निवडी बद्दल सामाजिक,राजकिय, तसेच विविध स्तरातून सुनिल भिसे यांचे अभिनंदन होत आहे.