भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे तहसीलदार बेल्हेकर यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
1) पंढरपूर तालुक्यातील निराधार महिलांना व गरीब शेतमजूर यांना रेशन कार्डावरील धान्य मिळावे
2) भाळवणी तालुका पंढरपूर येथील मंडल कृषी अधिकारी कार्यालय सतत बंद असते मोजे
3) भाळवणी येथे महिलांसाठी स्वच्छालय व एसटी स्टँड लवकरात लवकर व्हावे.
या संदर्भात निवेदन दिले असून परत एकदा वरील निवेदने सन 20-22 पासून देत आलो आहोत परंतु वरील खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे 30/8/2023 पर्यंत या निवेदनाचा विचार केला नाही तर राजश्री राजेंद्र ताड दिनांक 3/9/2023 रोजी भाळवणी येथे हनुमान मंदिरासमोर उपोषणास बसणार आहे.याची माहिती संबधित विभागाचे अधिकारी यांनी घ्यावी अन्यथा होणाऱ्या नुकसानास शासन जबाबदार राहील.