झुंज
आयुष्यात कधी कधी दोन पावले
मागे लागतात टाकावी,
त्यासाठी झुंज लागते करावी.
त्याच्या जोडीला हवा जुना अनुभवाचा प्रवास
मगच करता येईल पुढील आयुष्याचा प्रवास.
आयुष्याच्या या वाटेवर मनात असू द्या जिंकण्याची आशा
कारण यशाच्या या पावलांवर मनात येऊन देऊ नका निराशा.
आयुष्यात येतात अनेक संकटे लढताना,
करू संकटावर मात एकजुटीने झुंजताना.
प्रत्येक पावलांवर वाटते जातोय यशाकडे
पण प्रत्यक्षात मात्र पावले पडतात अपयशाकडे.
आता थांबायचं नाही,
जुना अनुभव व आत्मविश्वासाने जिंकू या आयुष्यातील यशाकडे...
कवि स्वप्निल जमदाडे
पंढरपूर