ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
विधानसभा निवडणूक अदयाप वर्षभरापेक्षा जास्त कालावधीच्या अंतरावर आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवाराच्यां समर्थकाकडुन आताच मोर्चेबांधणी सुरु झाल्याचे दिसुन येत आहे.ईगतपुरी तालुक्यातील एक युवा व लोकप्रिय नेते तुकाराम वारघडे यांचा नुकताच अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला आहे.
या सोहळयातच भावी आमदार तुकाराम वारघडे असा वांरवार उल्लेख झाल्याने राजकिय वर्तुळात तरंग उमटले आहेत. या विषयाची खमंग चर्चा आता तालुक्यातुन जोरदार पणे रंगताना दिसते आहे. विशेष म्हंणजे विदयमान आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थीतीतच हा उल्लेख झाल्याने पुढची समीकरणे कशी राहणार या बाबत चर्चेला ऊत आला आहे.
गत विधानसभा निवडणुकीतच तुकाराम वारघडे या युवक नेत्याने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली होती.मात्र ऐनवेळी अनेक नाटयमय घडामोडी घडल्या होत्या.तत्कालीन आमदार सौ.निर्मला गावित यांनी अकस्मात् कांग्रेस ला सोडचिट्ठी देत शिवसेनेचा पदर धरला होता.या मुळे सौ.गाविताचां पराभव करण्यासाठी कांग्रेससह सर्वच विरोधक एकवटले होते.आणि ऐनवेळी राष्ट्रवादीतुन हिरामण खोसकर यांना आयात करत कांग्रेस च्या वतीने लढवण्यात आले होते.विशेष म्हंणजे सौ.गाविताच्यां विजयासाठी सातत्याने हातभार लावणारेच सगळे विरोधात एकत्र आल्याने व एकास एक अशी लढत झाल्याने हिरामण खोसकर यांनी अनपेक्षित पणे बाजी मारली होती.त्यावेळी इच्छुक असणार्या वारघडेनां थांबवले गेले होते.
मात्र नुकत्याच झालेल्या वारघडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळयात वारघडे समर्थकानीं जाहिरपणे फलकबाजी व व्यासपीठावरून भावी आमदार म्हणुन वारघडेचां उल्लेख केला आहे. तसेच आता या नव्या दमाच्या युवकाला संधी देण्याचीही मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकिय वर्तुळात खमंग चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणूक आता अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेली.त्यातही कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीच्या सोबतीनेही विधानसभा निवडणूक होऊ शकते अशीही एक चर्चा सुरु आहे. तसे झाल्यास या निवडणुकीसाठी अगदीच कमी कालावधी उरलेला असणार आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात यावेळी अनेक नाटयमय घडामोडी घडल्याने अवघे राजकारणच ढवळुन निघाले आहे.
यावेळची निवडणुक कदाचित भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) या महायुती विरुद्ध कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उ.बा.ठा.गट) या महाविकास आघाडीत रंगण्याची दाट शक्यता आहे.
त्यात विदयमान आमदार हा कांग्रेस पक्षाचा असल्याने महाविकास आघाडीत ही जागा कांग्रेसलाच सुटणार यात तीळमात्र शंका नाही. या आघाडीत आता विदयमान आमदार हिरामण खोसकर यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असेल तर दुसरीकडे शिवसेना (उ.बा.ठा.गट) पक्षाने या जागेवर दावा केल्यास माजी आमदार सौ. निर्मला गावित यांचे नाव आघाडीवर असेल. या शिवाय कांग्रेस चे माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे व युवा नेते लकी जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत.
दुसरीकडे महायुती मध्ये शिवसेना (शिंदे गट) यांचा या जागेवर प्रबळ दावा असेल.तर या युतीकडुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीही जय्यत तयारी सुरु केली आहे.तर दुसरीकडे प्रकृतीच्या कारणावरुन माजी आमदार शिवराम झोले थांबणार कि नव्या उमेदीने सरसावणार ? ते इच्छुक म्हणुन रिंगणात उतरले तर मेंगाळ व झोले यांचेतच अंतर्गत स्पर्धा पहायला मिळेल.या शिवाय माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, विनायक माळेकर व माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांच्याही नावाची चर्चा रंगते आहे.
गंमत म्हणजे आघाडया दोन आणि इच्छुक उमेदवाराचीं मात्र भाऊगर्दी.यामुळे आगामी काळात बंडखोरी, पक्ष बदल, बेडुक उडया, शह काटशह आदी सर्वच नाटकाचें अंक पहायला मिळतील.
दरम्यान वारघडे समर्थकानीं जाहिरपणे भावी आमदार म्हणुन वाच्यता केल्याने राजकिय वर्तुळात खमंग चर्चा सुरु झाली आहे. वारघडे हे किमान सध्या तरी राष्ट्रवादी कांग्रेस च्या अजित पवार गटासोबत दिसत आहे. हा गट महायुतीत सामिल असुन या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा अग्रहक्क असेल.या पाश्वर्भुमीवर तालूक्याचे भुमिपुत्र गोरख बोडके हे राष्ट्रवादीचे नव्यानेच जिल्हाध्यक्ष झाल्याने जिल्हाध्यक्ष यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा अशी समर्थक व कार्यकर्ते यांची इच्छा असेल.शिवाय बोडके हे प्रतिकुल परिस्थितीतही विजय खेचुन आणण्यात माहिर आहे.आणि याच बोडके यांचे वारघडे हे कट्टर समर्थक आहेत. या पाश्र्वभूमीवर बोडके हे वारघडेच्यां पाठिशी राहणार का ? हा प्रश्न आहे.
दुसरीकडे हिरामण खोसकर यांचेशी बोडकेचें मधुर सबंध आहेत.तर माजी आमदार शिवराम झोले हे ही सातत्याने बोडके सोबत आहे. तर दुसरीकडे महायुती तील मेंगाळ यांचेशी बोडकेचें सबंध सर्वपरिचित आहे. त्यामुळे बोडकेच्यां शब्दालाही वजन प्राप्त झाले असुन बोडके नेमके कुणाला सोबत करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे वारघडे यांच्या रुपाने प्रबळ दावेदार समोर ठाकल्याने आमदार हिरामण खोसकर ही नक्कीच अस्वस्थ झाले असणार.अर्थात खोसकर हे मुरब्बी राजकारणी म्हणुन परिचीत आहेत.त्यामुळे ते आपले पत्ते आताच खोलतील याची शाश्वती नसली तरी ते आगामी व्युहरचनेसाठी तातडी करतील यात शंकाच नाही.
त्यामुळे वारघडे यांचा भावी आमदार म्हणुन उल्लेख व सर्व दुर चर्चा झाली असली तरी वारघडे यांनाही अडथळ्याची मोठी शर्यत पार पाडावी लागणार आहे यात शंका नाही.