भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक सुनील पाटील यांचा सत्कार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक भीमराव जाधव सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव, संदीप जाधव, रविराज शिंगटे,उत्तम पाटील,हणमंत गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनिल पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वर विश्वास ठेवला आहे.त्या विश्वासास् येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच पात्र राहू.लवकरच सभासदांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.सर्वांच्या अडचणी सोडविल्या जातील.

