शेळवे प्रतिनिधी
दि.२८ विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजित पाटील उर्फ आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे विविध उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले, शुक्रवार दि २८ जुलै रोजी प्रशालेत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा,आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांसाठी कार्यानुभव व क्राफ्ट पेपर वर्क्स ची कार्यशाळा घेण्यात आली, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी एकूण १२५ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,रांगोळी स्पर्धेसाठी ३०, काव्यवाचन साठी १५० तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी जवळपास २०० विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला चित्रकला स्पर्धेसाठी अनेक स्पर्धकांनी नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या, तसेच काव्यवाचन स्पर्धेत अनेक विध्यार्थ्यांनी स्वरचित कविता, सुप्रसिद्ध कवी आणि लेखकांच्या गाजलेल्या कविता,लोकप्रिय गीते,अभंग आणि गौळणी सादर केल्या,रांगोळी स्पर्धेतून अनेक विद्यार्थिनींनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संदेश देणाऱ्या अप्रतिम रांगोळी साकारल्या.
सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले,सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कौठाळी गावचे श्री. युवराज गोडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून मिथुन पवार उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. राम मोकळे, प्रदीप भोसले,स्वप्निल लोखंडे तसेच सौ.दिपाली कुंभार,सौ.मनिषा गोरे, सौ.अश्विनी यलमर,सौ.सोनाली गायकवाड तसेच सौ. कोळसे यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे नियोजन मोहन गायकवाड यांनी केले,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी स्पर्धक विध्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम व अटी सांगून शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी विध्यार्थ्यांना स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले, सोमवार दि.३१ जुलै रोजी सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे येथेच सकाळी ठिक १०:०० वाजलेपासून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, सहभागी स्पर्धक, पालक व परीक्षक शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.