सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई पाहता टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे तसेच जणावरांनाही चारा व पाण्याची कमतरता भासत असल्याने चारा छावण्या सुरू करण्यात याव्या यासाठी आज युवासेना सांगोला यांच्या वतीने तहसीलदार संजय खडतरे यांना वरील सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक हारीभाऊ पाटील, युवासेना समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, नवल गाडे, समाधान चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख अजय चव्हाण, अनिल बेहरे, बाबासाब खांडेकर, सचिन शिंदे, बाबासाहेब ऐवळे, सचिन सुरवसे, उमेश जावीर, सुमित चांदणे, अक्षय रुपनर, रघुनाथ ऐवळे व शिवसैनिक उपस्थित होते.

