41 रक्तदात्यांनी केले रक्तदान शिबिर आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा येथे १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने पंढरपूर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असता धोंडेवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला एक नवी दिशा दिली असे पंढरपूरचे सुपुत्र श्री अभिजीत पाटील यांचा १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी उपक्रमाचे आयोजन होत आहे.
यावेळी डॉ.राजाभाऊ देठे,डॉ.तानाजी देठे,ज्योतीराम देठे, औदुंबर देठे,मोहन देठे,महादेव देठे, श्रीराम देठे, नवनाथ देठे,सिताराम डोंगरे,उमेश गुरव,नितीन पासले,शंकर देठे,हरिभाऊ बुरांडे,बापू पवार,राहुल काटकर,संभाजी देठे,कृष्णदेव हुंबे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.