भाळवणी प्रतिनिधी
विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे नेते अभिजित पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे दि २८ जुलै पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये आज ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेसाठी तीन गटातून शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सकाळी १०:०० वाजता पंढरपूर येथील नेशन फस्ट अकॅडमी चे संस्थापक अतुल लामकाने व मोहिनी लामकाने यांचे विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संबंधित मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
त्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले,सनराईज मीडिया चे समाधान भैय्या गाजरे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी शेळवे गावचे सरपंच अनिल ज्ञानोबा गाजरे, उपसरपंच किरण देवचंद गाजरे होळे गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष घोडके,शेळवे गावचे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ गाजरे,बाळासाहेब गाजरे,मा.उपसरपंच तुकाराम भीमराव गाजरे,विठाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विठ्ठल(आप्पा)गाजरे,प्रगतशील बागायतदार अरविंद धर्मा लोकरे,विठ्ठल दगडू गाजरे,संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष प्रकाश मोहन गाजरे,गोपाळ गाजरे,भारत गाजरे,दिगंबर गाजरे,बालाजी सप्ताळ,दिपक आसबे,भजनदास गाजरे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी केले तर संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले तर सहशिक्षक मोहन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून सहशिक्षक राम मोकळे,प्रदीप भोसले,सुनिल लोखंडे, दिपाली कुंभार, मानिषा गोरे, सोनाली गायकवाड, सुवर्णा कोळसे,अश्विनी यलमर यांनी काम पाहिले.
दि.२८ ते ३१ जुलै पासून राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल एकत्रितपणे दि १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून दि.५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सदर सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव अंकुश गाजरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे...!!