पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन.एम. एम.एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विवेक वर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये 7विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करावा यावेळी प्राचार्य मुंढे यू.आर, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार, राजूभाई मुलाणी, सुनिल विश्वासे, संजय क्षीरसागर, शिवाजी येडवे, मुख्य लिपिक हनुमंत मोरे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा गाडेकर,रीया चव्हाण, प्राजक्ता शिंदे, आशिष माने, शौर्य साळुंखे, ओम जाधव, यथार्थ बिहाडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक सिरसट बी.एल, गुरव एस.एच,भंडारे एस.एस,गोवे एस.एस, टकले के.व्हि, कोळसे पी. पी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.