पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रणजित बागल यांचेवतिने अपंग शाळेतील "दिव्यांग" मुलांना "खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप" करण्यात आले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच उध्दव ठाकरे यांनी, ईर्शाळगडावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मी वाढदिवस साजरा करणार नाही तरी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही जाहिरातबाजी करू नये व होर्डिग्ज लावु नयेत, कुणीही हारतुरे देवुन शुभेच्छा देवु नयेत,उलट वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, समाजातील वंचित घटकांना आनंद देणार्या गोष्टींचे वाटप करून वाढदिवस साजरा करा असे आवाहन शिवसैनिकांना केले होते.
त्याच नुसार आज शिवसेना युवासेनेचे युवानेते रणजित बागल यांचे वतिने काॅलेज चौक, बायपासरोड, पंढरपूर येथिल नवजीवन अपंग शाळेतील दिव्यांग मुलांना "शैक्षणिक साहित्य व खाऊ" चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना रणजित बागल म्हणाले की उध्दव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगाना हे साहित्य वाटुन त्यांसोबतच आम्ही पक्षप्रमुख उध्दवसाहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत.
पुढे बोलताना भगवंत पांडुरंगाची कृपा व या दिव्यांगांच्या दुवाँ नक्कीच लाभतील आणि येत्या काळात आदरणीय पक्षप्रमुख उध्दवसाहेब पुन्हा दिमाखात मुख्यमंत्रीपदी जातील असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमास रणजित बागल यांचेसह स्वप्निल गावडे, प्रणव गायकवाड,हर्ष मोरे,प्रणित पवार,राम पवार, आदि उपस्थित होते.