पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
राज्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरातील नवीन बस स्थानक अर्थात जुन्या बस स्थानका शेजारील हे सध्या घाणीच्या विळख्यात सापडले असून नागरिक प्रवासी भाविक वारकरी हे प्रवास करून पंढरपूर शहर बस स्थानकात पाऊल ठेवून बाहेर पडतात त्यांना सर्वत्र दुर्गंधी असलेल्या परिसराचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य असून ही त्याची काही बोलकी छायाचित्रे वास्तविक पाहता ज्या ठिकाणाहून बस स्थानकात प्रवेश करतो त्याच ठिकाणी सर्वत्र घाणच घाण असून याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असून आरोग्य विभागाला तर त्याचे वावडेच आहे म्हणावे लागेल. त्या ऊपर ही बस स्थानकातील त्याच्याकडे स्वच्छतेची जबाबदारी आहे. त्याचेही परिसरात दुर्लक्ष आहे संपूर्ण परिसरच घाणीने व्यापला असून अशातच अस्ताव्यस्त रिक्षा, दुचाकी वाहने, भरीत भर म्हणून उभे असतात एसटी प्रवाशांना मुख्य दरवाजातून बाहेर पडताना या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असून थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्याच्या कडेला एसटी स्टँड च्या बाजूला पाणी साठते अशातच समोर केरकचरा असल्याने व तो कूजल्याने दुर्गंधी पसरली आहे. याबाबत पंढरपूर आरोग्य खात्याने तातडीने लक्ष घालून स्वच्छता करावी तसेच बांधा वापरा हस्तांतर करा या तत्त्वावर ज्या कंपनीला बस स्थानकाचा ठेका दिला आहे.
त्यांनी बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा परिसर स्वच्छ ठेवण्या ची जबाबदारी त्यांच्यावर आहे हे ते विसरूनच गेले आहेत तरी दोन्ही विभागाने तातडीने लक्ष घालून बस स्थानकासमोरील व आवारातील दुर्गंधी दूर करावी अशी प्रवासी, नागरिक यांच्यातून मागणी होत आहे.


