बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत सर व पुण्याचे शिवसेना उपप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे प्रचार प्रसिद्धीप्रमुख राजाभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पेशंटचे नाव अनिल रामचंद्र जडे वय साधारण 62 वर्ष राहणार जळोची तालुका बारामती जिल्हा पुणे या पेशंटला अचानक घशामध्ये त्रास होऊ लागला
नंतर त्यांना बारामती येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटल बारामती एमआयडीसी येथे दाखल केले असता तेथे त्यांचा घशाचा सिटीस्कॅन केला असता डॉक्टरांनी त्यांचा सिटीस्कॅन रिपोर्ट पाहिला असता त्यांनी पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला कॅन्सर आहे असे सांगितल्यानंतर पेशंटचे नातेवाईक अतिशय घाबरून गेले त्यांना काय करावे काय नाही असे सूचनाशी झाले नंतर त्यांनी बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा उप समन्वयक व नेहमी गोरगरिबांसाठी अहोरात्र समाजसेवा करणारे सतीश महादेव गावडे यांचा फोन नंबर मिळाला नंतर त्यांनी वरील पेशंट बाबत घडलेला सर्व प्रकार सतीश गावडे यांच्या निदर्शनास आणून दिले.
सतीश गावडे यांनी तात्काळ व ताबडतोब पेशंटची गाठ घेऊन प्रथम पेशंटला धीर दिला कारण की पेशंटचे पुढील उपचार करण्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याकारणाने सतीश गावडे यांनी त्या पेशंटला असे सांगितले की तुम्ही बिलकुल घाबरू नका तुमचा एकही नवा पैसा खर्च होणार नाही व तुमच्या पेशंट एकदम ठणठणीत होऊन जाईल तुम्ही बिलकुल काळजी करू नका कारण की आपल्या गोरगरीब जनतेसाठी व रुग्णांसाठी पांडुरंगा सारखेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे व महाराष्ट्र राज्याचे ज्यांना जगाने आरोग्य दूत म्हणून सन्मानित केले ते गोरगरिबांचे कैवारी मंगेशजी चिवटे हे तुमच्यासाठी देवदूत म्हणून हजर आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका नंतर पेशंटने पुढील काळजी करायची सोडून दिली .
नंतर सतीश गावडे यांनी वरील मान्यवरांच्या खालील पेशंटला बार्शी येथे नेऊन तेथील तज्ञ डॉक्टर डहाळे सरांशी संपर्क समक्ष करून महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतून वरील पेशंटचे ऑपरेशन बसवून दिले व ढाळे सरांनी वरील पेशंट वरती अतिशय यशस्वीरित्या उपचार करून शस्त्रक्रिया पार पाडले त्याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी वरील सर्व मान्यवरांचे व वेळेत व तात्काळ व नेहमी गोरगरिबांना सामाजिक कार्यांमध्ये मदत केले ते सतीश महादेव गावडे तालुका बारामती जिल्हा पुणे लिमटेक यांचे तोंड भरून कौतुक केले.

