पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता परिसरातील गावांमधून नागरिकांची मागणी होती त्याचा पाठपुरावाही जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे मार्फत करण्यात आलेला होता.
त्या वेळचे जिल्हा परिषद सदस्य शोभाताई वाघमोडे देशमुख पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांचे मार्फत प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाळवणी येथे 50 खाटा चे ग्रामीण रुग्णालय व्हावे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, अखेर शासनाने आदेश काढून 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे.
यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील, प्रशांतराव परिचारक यांनी पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. यामुळे परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांची व त्यांच्या आरोग्याची सोय होईल.

