खडकी प्रतिनिधी
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर पुन्हा घेण्यात येणार आहे. नवीन उमेदवाराची नियुक्ती केल्यास बोर्डातील कामे निपक्ष:पातीने होतील. बोर्डातील निवृत्त कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यात येऊ नये अशी मागणी एडवोकेट पूजा सहारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोर्डाच्या कार्यालया मधून आरोग्य निरीक्षक म्हणून विलास खांदोडे सुमारे ३ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते, तर बोर्डाचे अभियंता सुहास संत ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत, या दोघांनाही निवृत्त झाल्यावर पुन्हा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
बोर्ड कार्यालयातून निवृत्त झालेले खांदोडे आणि संत यांना निवृत्त झाल्यावर कॉन्टॅक्ट पद्धतीने घेण्यात येऊ नये. दोघांनाही निवृत्तीनंतर कामावर घेतल्यास त्यांच्याकडून निपक्ष:पातीने काम करणार का असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. प्रशासनाला या दोघांनाच कामावर पुन्हा घेण्याची गरज भासली याचा देखील अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सहारे म्हणाले.
दोन्ही कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष काम केल्यामुळे त्यांना चांगला पगार देखील मिळत होता, तर आता पेन्शन मिळत आहे. प्रशासनाला कर्मचाऱ्यांची गरज भासल्यास नवीन अन्य उमेदवाराची नियुक्ती नियुक्ती करणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. नवीन उमेदवार नियुक्त केल्यास संपूर्ण इमानदारीने आणि जबाबदारीने काम करतील, तसेच नवीन कर्मचाऱ्यांच्या पालन पोषणासाठी हातभार देखील लागेल असे सहारे यांनी सांगितले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डीतील ९४० पदांपैकी ५३० पदे म्हणजेच सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे नवीन नियुक्तीसाठी रक्षा मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र त्यांनी सध्या नवीन प्रकारचे नियुक्ती न करण्याच् आदेश दिले आहेत. नवीन उमेदवाराची भरती केल्यास त्यांना बोर्डाची पॉलिसी तसेच परसराची माहिती नसल्याने ते उपयोगी ठरणार नाहीत. सध्या दोघांना घेण्याबाबत बोर्डाच्या बैठकीत निर्णय अद्याप झाला नाही.
रॉबिन बलेचा
मुख्य कार्यकारी अधिकारी