पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
भल्या पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या 74 वर्षीय महिलेला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वराने जोराची धडक दिल्याने जागीच पसरून पडल्याने यांचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास टाकळी पंढरपूर रोडवर रेल्वे स्टेशन नजीक घडली यात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. टाकळी रोडवर पहाटेच्या सुमारास महिला मध्यमवयीन पुरुष, तरुण फिरावयास जातात. या मार्गावर सिमेंटचा रस्ता झाल्याने चार चाकी वाहन चालक,दोन चाकी वाहन चालक अति वेगाने वाहने चालवून येजा करतात. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन दोघा जणाचा नाहक बळी गेला आहे.
मंगळवारच्या पहाटे रजनी अनिल गुंडेवार वय 74 नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने भल्या पहाटे फिरावयास निघाले. टाकळी कडून यमाई तलावाकडे निघालेल्या भरधाव दुचाकी स्वराने जोराची धडक दिल्याने जागेवर पडल्या. वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने निष्पाप बळी घेतला असे म्हणल्यास गैर ठरणार नाही.
ज्यावेळी हा रस्ता सिमेंट काँग्रेसचा झाला त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने या मार्गावर महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने, शिवाय बाग असल्याने तसेच रेल्वे स्टेशन आहे .यामुळे या मार्गावर नेहमीच सर्वच वाहनधारकांची गर्दी असते. याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे गति रोधक बसवावे अशी मागणी केली होती.पण शासकीय यंत्रणेने याकडे लक्ष दिले नाही.
यात काही अति उत्साही भावी नगरसेवक आणि रातोरात प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात गतिरोधक केल्याने हे गतिरोधकही मृत्यूला आमंत्रण देणारे ठरले या नियमबाह्य गतिरोधकामुळे अनेक जण जायबंदी झाले होते. याबाबतच्या तक्रारी व ओरड होताच हे शासकीय नियमाप्रमाणे नसलेले गतिरोधक काढून टाकण्यात आले. परंतु पंढरपूर नगर परिषदेने या मार्गावर शासकीय नियमाप्रमाणे गतिरोधक करणे गरजेचे असताना याकडे मात्र दुर्लक्ष केल्याने या मार्गावर मृत्यूला आमंत्रण देणारे अपघात घडत आहेत. असाच आज एक निष्पाप बळी वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने घेतला असून तोही त्यात जखमी झाला आहे.
या प्रकाराने या परिसरात हळूहळू व्यक्त होत असून नगरपरिषद पंढरपूर यांनी तातडीने लक्ष घालून नियमाप्रमाणे गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी या मार्गावरील नागरिकांची रहिवाशांची आहे.