मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्वेकडील समर्थ नगर-सद्भक्ती मंदिर २६४ क्र. बस सेवेत सध्यस्थितीत धावत असलेल्या ०२ बसेस मध्ये आणखी किमान ०२ बस वाढविण्याबाबत जोगेश्वरी पूर्व विधानसभा शाखा क्र. ७३ चे शाखाअध्यक्ष रमाकांत नर यांनी बेस्ट बस प्रशासनाशी दि. २ जुलै २०२३ रोजी पत्रव्यवहार केला होता. जोगेश्वरी-पूर्व येथे बेस्ट बस प्रवाशी नागरिकांना देत असलेली सेवा मार्गीका समर्थ नगर- सद्भक्ती मंदिर ते स्टेशन मार्गे २६४ क्र. बस सेवेसाठी सध्यास्तिथीत दोनच बस असल्याने सकाळी शाळेत जाणार्या विद्यार्थांना त्रास होत असल्याची बाब पालक वर्गाकडुन निदर्शणास आली. त्यातच सकाळी कामाला जाणारे नागरिक व विद्यार्थी यामुळे गर्दी होत विद्यार्थांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची बाब समोर आली. याबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत नक्कीच विचार करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे अधिकार्यांकडुन सांगण्यात आले होते. शुक्रवारी १४ जुलै २०२३ रोजी केलेल्या चर्चेत मजास बस डेपो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मनसेचे विभाग अध्यक्ष श्री. बाबुभाई पिल्ले व प्रभाग क्र. ७३ चे शाखाध्यक्ष श्री. रमाकांत नर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रवासी नागरिकांसाठी आणखीन एक बससेवा देण्यात आली.
मनसेने केलेल्या या मागणीच्या अनुषंघाने बेस्ट प्रशासनाने दखल घेऊन समर्थ नगर - सदभक्ती मंदिर २६४ क्र. बस सेवेत सध्यस्थितीत सेवा देत असलेल्या दोन बसेसमधे आणखीन एक बससेवा वाढवण्यात आली. ही नवीन बस सेवा सोमवार दि. १७ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आली. सदर बससेवा ही सकाळी ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५.०० ते रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या मर्यादित वेळेत बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने केलेल्या या मागणीचा विचार करून सर्वसामान्य नागरिकांसाठी मजास बस डेपो प्रशासनाने ही बस सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनसेने बेस्ट प्रशासनाचे आभार मानले.

