पंढरपुर प्रतिनिधी
दि २५.७.२०२३ पंढरपुर शहरातील संत पेठेत राहणारे दयानंद विठ्ठल वायदंडे यांनी खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एक महीना शिक्षा व रक्कम रू १,०५,०००/- एवढा दंड व दंड नाही भरल्यास जादा तीन महीने शिक्षा येथील प्रथम न्यायदंडाधिकारी श्री. ए. एस सोनवलकर साहेब यांनी सुनवली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की पंढरपुर येथील कर्मयोगी सु. रा. परिचारक ग्रा बिगर शेती सह पतसंस्था तुंगत शाखा पंढरपुर यांचेकडून दयानंद विठ्ठल वायदंडे यांनी ६५,०००/- कर्ज घेतले होते सदर कर्ज वेळेत परतफेड केली नाही म्हणुन पतसंस्थेने वारवार वसुलीची मागणी केली असता दयानंद विठ्ठल वायदंडे यांनी पतसंस्थेस रक्कम वसुलीपोटी रक्कम रूपये ७६,३००/- चा चेक दिला होता.
सदर चेक न वटल्यामुळे पतसंस्थेने कर्जदार दयानंद विठ्ठल वायदंडे यांचेविरूध्द पंढरपुर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयत चलनक्षम दस्त ऐवज कायदा कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली. सदर केसचा निकाल होऊन सदर आरोपीस एक महीना शिक्षा व रक्कम रू १,०५,०००/- एवढा दंड व दंड नाही भरल्यास जादा तीन महीने शिक्षा सुनवली आहे.
सदर कामात फिर्यादीसंस्था सु-रा परीचारक पतसंस्थेतर्फे श्री नितीन विठ्ठलराव पाटील यांची महत्वपुर्ण साक्ष धरण्यात आली. सदर फिर्यादी सु. रा. परिचारक पतसंस्थेच्यावतीने अॅड. मनोहर नारायण हिंगणे व अॅड सुरज पाखरे यांनी काम पाहीले.