पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाणारा हा महिना असून या अधिक महिन्याला वारकरी संप्रदायात महत्वाचं अधिक मासात महिनाभर व्रतवैकल्य यांची पंढरीत रेलचेल असून धार्मिक कार्यक्रमांनी अंधेरी नगरी गजबजुन गेली आहे.
आज शनिवारी कमला एकादशी आल्याने व त्याला जोडून रविवार आल्याने पंढरीत लाखो भक्तांची मान्य आणि जमली असून पहाटेपासूनच वारकरी भाविक भक्त भल्या पहाटे पासूनच नगर प्रदक्षिणा करण्या स दंग झाले होते. अधिक मासात आलेली ही एकादशी मिनी आषाढी एकादशी भरली म्हणल्यास वावगे ठरणार नाही. पुरुषोत्तम महाराज अधिक मास यामुळे पंढरीत गेले दहा ते बारा दिवस झाले भाविक भक्त याने पंढरी नगरी गजबजून गेली आहे अधिकमासामुळे व शासनाने महिला वर्गाना 50 टक्के एसटी प्रवासात सवलत दिल्याने या वारीला महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
पंढरी नगरी पहाटेपासूनच विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे लाखो भक्तांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम मासातील अर्थात अधिक महिन्यातील एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकऱ्यांनी साजरा केला.