मुंबई प्रतिनिधी
जीवनदाता सामाजिक संस्था ( रजि.)मुंबई च्या वतीने *दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३* च्या दरम्यान *मरणोत्तर देहदान (बॉडी डोनेशन) संकल्प नोंदणी अभियान* मोहीम राबविण्यात येत आहे.
अवयव दान व देहदान यामध्ये मोठा फरक असतो याची खूप साऱ्या जणांना कल्पनाच नाही.
लोक सरासपणे बोलतात माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव काढून दान करा व नंतर माझें अंत्यसंस्कार करा.
हजारों माणसे अवयव दानाचे फॉर्म भरतात पण देहदानाचा फॉर्म भरणारा हजारातून एकच असू शकतो.
*ही नोंदणी केवळ देहदान (बॉडी डोनेशन) साठीच आहे.* अवयव दान (ऑर्गन डोनेशन) साठी नाही हे लक्षात घ्यावे.
अवयव दान 12 लाखात एक होते कारण ब्रेनडेड झालेले रुग्णच केवळ अवयवदान करू शकतात यासाठी हॉस्पिटलचे डॉक्टर यावेळी मार्गदर्शन/ समुपदेशन करतात.
माणसाचे मरण हे अंतिम सत्य आहे. नैसर्गिकपणे मृत्यू झाला तर मरणोत्तर देहदान संकल्प करणे हे आपल्याला शक्य आहे. पण देहदान संकल्प करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा खूपच कमी आहे.
मी अवयव दान नोंदणी केलेली आहे असे अभिमानाने सांगणारे खूप जण भेटतील आणि प्रत्यक्षात ते होऊ शकेल की नाही याची कोणालाच खात्री नाही. कारण लाखात एक रुग्ण *ब्रेनडेड* होतो
या उलट जर मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला तर नक्कीच याची जाणीव आपल्या घरच्यांना असेल व ते आपली अंतिम इच्छा पुरी करू शकतील.
*अवयवदानात आपले अंत्यसंस्कार होऊ शकतात पण जर देहदान केले तर अंत्यसंस्कार हा विषयच राहत नाही.*
आपण रूढी, परंपरा जपणारे. लोक, समाज काय बोलेल यात अडकणारे. पण आता माणसाची विचारसरणी बदलत चालली आहे. समाजासाठी जगण्याची वृत्ती प्रत्येकाच्या मनात घर करत आहे.
देहदानाबाबत विचार प्रत्येकाच्या मनात असतो पण तो अंमलात येत नाही, पण जर आपले विचार बदलले तर नक्कीच आपण मरणोत्तर देहदान करू शकतो. याची सर्वांना खात्री असते.
मृत्यूनंतर आपलं शरीर जळून नष्ट होण्यापेक्षा जर ते कोणाच्या उपयोगी येत असेल तर *आपले देहदान नक्कीच महादानास पात्र ठरते.*
*देहदानापूर्वी नेत्रदान, त्वचा दान तसेच शरीरातील काही टीशु दान करता येतात* व नंतर *संपूर्ण देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला मेडिकल कॉलेज /हॉस्पिटलला दान करता येतो.*
एका देहावर १० डॉक्टरांचे प्रशिक्षण अवलंबून असते. जळून नष्ट होणारा देह जर दान केला तर नक्कीच वैद्यकीय क्षेत्रात चांगली क्रांती घडेल. चांगले डॉक्टर आपल्या देशासाठी घडतील.
जीवनदाता सामाजिक संस्थेने ही *वेगळी पाऊलवाट निवडली आहे.* कठीण आहे पण अशक्य नाही.
मरणोत्तर देहदान (बॉडी डोनेशन) संकल्प करण्यासाठी आपण जर तयार असाल तर अवश्य आमच्या मरणोत्तर देहदान संकल्प अभियान मोहिमेत सामील व्हा.
*मरणोत्तर देहदान संकल्प नोंदणी जरी मुंबईत केली तरी भारतात कुठेही आपल्याला देहदान करता येईल.* मरणोत्तर देहदान संकल्प ही आपली अंतिम इच्छा असेल व याची आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना जाणीव असावी यासाठीच हा संकल्प आपण करीत आहोत.
मरणोत्तर देहदान संकल्प अभियानात नोंदणी करणाऱ्या दात्यास के ई एम हॉस्पिटल/वैद्यकीय कॉलेज Anatomy विभागाचे *बॉडी डोनेशन कार्ड* तसेच जीवनदाता सामाजिक संस्थेच्या वतीने *सन्मानपत्र* देऊन दात्याचा सन्मान केला जाईल.
*विचार बदला देश बदलेल*
आपण अवयव दान नोंदणी केलेली असेल तरी आपण देहदान नोंदणी करू शकता. आपण जेव्हा पूर्ण देहच दान करायची इच्छा बाळगून आहोत, अवयव दान करण्यास सहज कोणीही तयार होईल आणि कदाचित ब्रेनडेड झालोच तर अवयव दान नक्कीच होईल.
काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल, जगाला वेगळा मार्ग दाखवण्याचा ध्यास असेल, *हो माझ्यात आहे हिम्मत मरणोत्तर देहदान करण्याची* हा संकल्प केला असेल, केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे म्हणत ठाम निश्चय करा.
अवश्य आमच्या या विशेष मोहिमेत सामील व्हा. कुठल्याही इतर माहितीसाठी तसेच देहदान फॉर्म साठी संपर्क करा. देहदान फॉर्म सोबत आपल्याला देहदानाबाबत इतर माहिती पुरविली जाईल. ह्या फॉर्मची पूर्तता करून,जवळच्या नातेवाईकांची सही घेऊन, स्वतःच्या आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी व 3 पासपोर्ट साईज फोटोसाहित तो फॉर्म सांगितलेल्या पत्यावर आपणांस पाठवावा लागेल.
*केईएम वैद्यकीय कॉलेज /हॉस्पिटल चे बॉडी डोनेशन कार्ड व संस्थेचे प्रमाणपत्र आपणांस एकाच वेळी विशेष समारंभात सन्मानाने दिले जाईल.*
*जीवनदाता सामाजिक संस्था(रजि.), मुंबई*
गणेश आमडोसकर: 98927 14131
प्रशांत म्हात्रे: 77000 76563
जान्हवी नाईक : 75063 67212