सोलापूर प्रतिनिधी
संशोधनाची उत्पादकता वाढणे ही काळाची गरज असून संशोधकांनी विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टूल्स चा वापर करणे क्रम प्राप्त झाले आहे. मानवी प्रज्ञेला तोड नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुनियोजित वापर करणे अत्यावशक बनले आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत यांनी केले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात जेष्ठ संशोधक डॉ.एस.एच.पवार लिखित पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.राजनीश कामत यावेळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजय नवले कॅम्पस डायरेक्टर सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर, जेष्ठ संशोधक डॉ. एस. एच. पवार, डॉ. शंकर नवले प्राचार्य सिंहगड महाविद्यालय सोलापूर , निखत शेख प्राचार्य सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ. शंकर नवले यांनी जेष्ठ संशोधक डॉ. एस. एच. पवार लिखित नोव्हा पब्लिशर्स यूएसए प्रकाशीत सिल्क फायब्रोईन : ऍडव्हान्ससेस ईन अँप्लिकेशन्स अँड रीसर्च या पुस्तकाबद्दल माहिती दिली. पुढे बोलताना डॉ. कामत म्हणाले की संशोधन आणि तंत्रज्ञान ह्या दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत. डॉ. एस. एच. पवार यांच्यासारख्या जेष्ठ संशोधकामुळे तरुण पिढीमध्ये संशोधनाबद्दल आवड निर्माण झाली आहे. डॉ. एस. एच. पवार यांचे संशोधनातील योगदान थक्क करणारे आहे. डॉ.पवार सरांमुळेच संशोधनाच्या अनेक संधी मला प्राप्त झाल्या.यावेळी त्यांनी यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या.
डॉ. पवार बोलताना म्हणाले सिल्क फायब्रोईन मुळे यावर लिहलेल्या पुस्तकांमुळे सिल्क सायन्स आणि टेकनॉलॉजीला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. या पुस्तकामुळे नवसंशोधकांना पर्वणी मिळणार आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. भावना श्रीवास्तव यांनी केले.

