सोलापूर एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगांव ठरले विद्यापीठात उत्कृष्ठ महाविद्यालय
दुहेरी पुरस्काराने सिंहगड सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
सोलापूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ठ महाविद्यालयाचा पुरस्कार यंदाच्या वर्षी सोलापूरच्या केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला आहे. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांना उत्कृष्ठ प्राचार्य असे दुहेरी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे दर्जेदार तंत्र शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सर्वोत्तम अभियंते घडवण्याचं काम या महाविद्यालयात अव्याहतपणे सुरू आहे.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात त्यापैकी शिक्षक पालक योजना, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग,शिक्षक आपल्या दारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे वैयक्तीक लक्ष, उद्योजकतेसाठी प्रोत्साहन, फॉरेन लँग्वेज ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स मार्गदर्शन ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,राष्ट्रीय पातळीवरील उद्योग जगतातील सर्व विषयांतील तज्ज्ञांचे एक्स्पर्ट लेक्चर्स या सर्व प्रकारच्या अभिनव उपक्रमामुळे महाविद्यालयाला अगदी पहिल्याच प्रयत्नात नॅक कमिटी ने ३.१२ गुणांसह A ग्रेड प्रदान केला होता. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल तर्फे ARIIA चे मानांकन सुद्धा या महाविद्यालयाने पटकावला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे AAA साठीचे A++ मानांकन मिळाले आहे. महाविद्यालयात शिकलेले माजी विद्यार्थी हे अनेक कंपन्यांत, शासकीय संस्थांत यशस्वीपणे मानाची पदे भूषवित आहेत. सिंहगड च्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत मागच्या वर्षी देशभरात प्रथम क्रमांक पटकावला. सिंहगड महाविद्यालय हे विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांत प्लेसमेंट च्या संधीसाठी प्रसिद्ध आहे. याचे कारण म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्याच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळते.
सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन नवले सर यांच्या संकल्पनेतील ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार शिक्षणाची गंगा पोचवण्याचे ध्येय साध्य करण्याचे काम या महाविद्यालयामार्फत होत आहे. सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूर चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सिंहगड सोलापूर कॅम्पस ची घोडदौड जोरात सुरू आहे. सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे व प्रशासनावर पकड असल्यामुळे शिक्षण अध्यापन प्रक्रिया ही अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणली जाते. यापूर्वी राष्ट्रीय व राज्य स्तरावर अनेक पुरस्कार मानांकने या महाविद्यालयाला मिळाले आहेत. या सर्व योगदानाची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ठ महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे सिंहगड च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन.नवले सर , संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.महाविद्यालयाला पुरस्कार मिळाल्याने सिंहगड च्या विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सिंहगड ची अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आहे.आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.इतर महाविद्यालयाच्या तुलनेत सर्वाधिक प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होतात. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला, या पुरस्काराचे श्रेय आमच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते.
संजय नवले
सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, व कॅम्पस डायरेक्टर सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानून माझ्याबरोबर काम करत असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या योगदानामुळे व आमच्यावर विश्वास ठेवून सर्व आजी माजी विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्या सहकार्यामुळे तसेच आजपर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळे विद्यापीठाने मला उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कारासाठी सुयोग्य समजले याचा मनस्वी आनंद आहे.
प्राचार्य. डॉ. शंकर डी. नवले
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर.