मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
जळगाव पिंपरूड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना समग्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश, बुट तर मातोश्री फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तसेच आदिवासी बहुल जानोरी गावातील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी गावच्या सरपंच मंगला कोळी, शाळा समिती अध्यक्ष महेन्द्र सुरवाडे, मुख्याध्यापक सलीम तडवी, मातोश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष जनार्दन जंगले, उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी गाव जानोरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करतांना समुपदेशक श्री अशोकराव भंगाळे यांनी मार्गदर्शन केले, यापूर्वीही मातोश्री फाउंडेशन तर्फे समाजातील विविध वंचित गरीब व आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्याना मदत करण्यात आलेली आहे.जे जे उत्तम व चांगले आहे ते ते आम्ही समाजासाठी करीत राहू असे मातोश्रीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

