मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील पिंपलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सीतानगर यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दुर्घटना ग्रस्त इर्शाळ वाडीतील लोकांना किराणा सामान व नवीन कपडे देऊन सहकार्य करण्यात आले.
मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश शेटये, समीर गुरव, अनिकेत मोऱ्ये, गणेश तेली, प्रदीप दर्पे, गौरव नेमसे, जितेश जगताप आदिनी स्वतः तिथे जाऊन गावकऱ्यांना सामान वितरीत केले व त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा छोटासा प्रयत्न केला.
जोगेश्वरीतील ज्या ज्या लोकांनी या कार्यसाठी सहकार्य केले त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले..यापुढेही आम्हाला जे जे शक्य आहे त ते चांगल करण्याचा मानस असल्याचे मंडळाचे हितचिंतक ज्ञानेश्वर परब यांनी सांगितले.