भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील प्रियांशू अरुण म्हेत्रे याला राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह (neet) परीक्षा मध्ये 700 पैकी 579 गुण मिळवून यश संपादन केले आहे.
त्यांच्या प्राथमिक शिक्षण भाळवणी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे झाले आहे.तसेच अकरावी व बारावी चे शिक्षण अकलूज येथे झाले आहे.पुढे निटचे क्लास अकलूज येथील शिवम क्लासेस चे संचालक कालिदास बाबा लिंगे यांच्याकडे क्लास लावले होते.
वडिलांचे छत्र हरपले असताना सुध्दा हे यश मिळाल्याबद्दल प्रियांशू अरुण म्हेत्रे याचा मच्छिंद्र दत्तू लिंगे, डॉ. सौरभ राऊत,बापूराव लिंगे, विजय शिंदे, अमोल लिंगे, दिनेश गवळी,किशोर खरडकर, डॉ. वैभव लिंगे, अभिजित लिंगे समाधान लिंगे, वैभव हरी लिंगे, विकी लिंगे, स्वप्नील लिंगे, रोहित लिंगे यांनी सत्कार करून कौतुक केले.