सांगोला प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार तसेच शिवसेना संपर्कप्रमुख अनिल भाऊ कोकीळ साहेब, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे , ता संपर्क प्रमुख कैलास चव्हाण , शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला युवासेनेची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत युवासेना शाखा विस्तार व संघटना वाढीसंदर्भात चर्चा करून युवासेना उपतालुकाप्रमुख २, विभाग प्रमुख १, उपविभाग प्रमुख १, गटप्रमुख ३ व गावातील नेमलेल्या शाखाधिकारी, उपशाखाधिकारी, सचिव, सहसचिव व शाखा समन्वयक अशा या पदाधिकाऱ्यांना युवासेना विस्तारक, शिवसेना जिल्हाप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते पदपञ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या बठकीचे आयोजन युवासेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, युवासेना समन्वयक शंकर मेटकरी व युवासेना शहर प्रमुख सौरभ चव्हाण यांनी केले होते.
यावेळी युवासेना विस्तारक उत्तम आयवळे , शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, शिव आरोग्य सेनेचे ता समन्वयक नवलकुमार गाडे, शिवसेना ता समन्वयक भारत मोरे, शिवसेना शाखाप्रमुख समाधान चव्हाण, शाखाप्रमुख संतोष टाकळे, शाखाप्रमुख बबण गायकवाड, शाखाप्रमुख योगेश खुळपे, शाखाप्रमुख सचिन सुरवसे, संतोष येडगे, सागर चव्हाण, शरद गुरव, रघुनाथ आयवळे, गणेश चव्हाण अक्षय रुपनर व ओम माने आदी उपस्थित होते.
सर्व तमाम शिवसैनिक व युवासैनिक या सर्व उपस्थितांची मनपूर्वक दिलगिरी शंकर मेटकरी यांनी व्यक्त केले.