पळशी प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेवस्ती येथे शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी पृथ्वीराज शेवाळे,धनंजय शेवाळे ,जयंत शेवाळे, प्रशांत शेवाळे व भूषण चंदनशिवे यांच्याकडून शाळेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात लागणारे सर्व साहित्य वाटप करण्यात आले.
यात शाळेची बॅग, स्केच पेन, रंगखडू, पेन, पेन्सिल, वह्या, पाण्याची बॉटल, इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजार रुपये किमतीचे साहित्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली मधील नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. व इतर सर्व विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक दुर्योधन नाना शेवाळे, शाळेचे माजी मुख्याध्यापक वसंत बिराजदार , शाळेचे मुख्याध्यापक कावरे , सहशिक्षक सागर लोंढे व विद्यार्थ्यांचे पालक, अंगणवाडी सेविका दुबे या सर्वांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर सर्व मुलांनी आनंद व्यक्त केला व पुढील वर्षीही आम्हीच गुणवंत विद्यार्थी म्हणून येण्यासाठी प्रयत्न करणार अशा प्रकारचा आशीर्वाद व्यक्त केला.यावेळी विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.