मंगळवेढा प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीचे मंगळवेढा तालुक्यातील नूतन सदस्य आकाश खरजे व बाळसागर खरजे यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या हस्ते फेटा बांधून शाल पुष्पगुछ व ओळख पत्र देऊन मरवडे ता मंगळवेढा येथे सन्मान करण्यात आला.
पत्रकारांनी एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत* डॉ आशिषकुमार सुना यांचे प्रतिपादन
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी निवेदन पत्रव्यवहार करत आहे
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती यादीवर नसलेल्या वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण आधीस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांवर दाखल करण्यात आले.
खोट्या गुन्ह्यांची चौकशी पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या हितासाठी विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत असल्याचे सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना यांनीयावेळी केलं आहे.
या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जनता संघर्ष न्यूज चेसंपादक सिद्धार्थ भडकुंबे सत्यराज केंगार राजकिरण सुना सुरेश आयवळे चंद्रकांत केंगार करण सुना सागर खरजे उपस्थित होते