गादेगाव प्रतिनिधी
नुकताच हाती आलेला निकाल एमएचटी सीईटी चा या परीक्षेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मोठे संपादन केले आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. बारावी नंतरच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी एमएचटी सीइटी परीक्षा पुढील प्रवेशासाठी आवश्यक असते. या परीक्षेमध्ये प्रीती कलागते 99.25 सुमित रणदिवे 98.10 सुयश चव्हाण 97.57 हर्षदा यलमार 97.51 संजीवनी पिसे 97 .40 श्वेता माळी 96.43 करण भोसले 95.03 श्वेता देशमुख ९५.४९ अश्विनी ढवळे 95. 49असे उल्लेखनीय मार्क संपादन केले आहेत.
शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा नुकताच बारावीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागून 35 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत .या सीईटीच्या निकालामुळे विद्यार्थ्यांना हवे असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळणार आहे. यामध्ये इंजीनियरिंग, मेडिकल, कृषी, विधी, त्याचबरोबर इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळणार आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे ,सहशिक्षक दीपक देशमुख, राजेंद्र भोसले ,संतोष पवार, सोमनाथ भुईटे, नागेश कांबळे, नियाज मुलाणी, वर्षा मोरे, शितल मस्के, शितल बागल, अजय मोरे आदींनी अभिनंदन केले.