पंढरपूर प्रतिनिधी
गट सचिव हा परिचारक परिवाराचा महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन माननीय आमदार प्रशांत रावजी परिचारक यांनी केले.ते पंढरपूर तालुक्यातील सेवानिवृत्त गट सचिवांच्या सेवानिवृत्ती निमित्त बोलत होते.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये बोलताना परिचारक म्हणाले की, गटसचिव व स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे एक अतूट जिव्हाळ्याचे नाते होते मोठ्या मालकांच्या राजकारणामध्ये गट सचिवांचे योगदान फार मोठे आहे. जे नाते सचिवांचे आणि मोठ्या मालकांचे होते ते इथून पुढे आपणही जोपासू. तसेच इथून पुढे नवीन गटसचिवांनी संस्था या नावाप्रमाणे विविध कार्य करून सोसायटीच्या नावलौकिक वाढवावा असे म्हणाले.
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि.,श्रीपुर या कारखान्याच्या नूतन तज्ञसांचालकांचाही निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी तानाजीराव वाघमोडे देशमुख, हरीशदादा गायकवाड, दिलीपराव चव्हाण, दाजी भुसनर, दिनकर भाऊ मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी तानाजीराव वाघमोडे -देशमुख, विजय माळी, बाळासो बुधनेर ज्ञानदेव मदने, मच्छिंद्र पाटील, बाळासाहेब सावंत, नानासो सरवळे,विष्णुपंत लिंगे , अनिल भाकरे, विष्णू पिसे, विजय कुलकर्णी, विजय फाटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर गट सचिव संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे यांनी केले व सूत्रसंचालन विजयकुमार मोकळे यांनी केले यावेळी पांडुरंग व्यवहारे यांनी सचिवांचे पगार वेळेत व्हावेत, याबाबत योग्य ते आदेश संबंधितांना व्हावे अशी विनंती केली व आभार मधुकर कदम यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंढरपूर गट सचिव संघटनेने परिश्रम घेतले.