सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर तुळजापूर वेस चौकातील करंजकर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून धर्मवीर राजे प्रतिष्ठान व एस बी आय सेवानिवृत्त ऑफिसर अशोक खैराट परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करंजकर विद्यालयात गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष साठे यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या सचिवा श्रीमती धांनम्मा मधली, मुख्याध्यापिका राजश्री तडकासे,तसेच अशोक खैराट साहेब आणि शकुंतला खैराट आणि धर्मवीर राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब माने प्रतिष्ठानचेआधारस्तंभ शशी भाऊ थोरात ,दैनिक जनमत चे पत्रकार राहुल रणदिवे प्रतिष्ठानचे सल्लागार गौरव जक्कापुरे तसेच शहर पोलीस अमोल हुळ मजगे ,आणि सदन व्यापारी प्रकाश तारनाळकर , यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी नंद्याळ यांनी केले तर आभार रुद्रमणी स्वामी यांनी मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .