पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आषाढी यात्रा कालावधीत मंदीर समितीकडून भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची. तसेच वारी कालावधीत मंदिर समिती मार्फत करण्यात आलेले नियोजनाबाबत माहिती घेवून आवश्यकत्या सूचना दिल्या.