पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात "प्रोटोटाइप प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल नवी दिल्ली तर्फे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. एस ए जेऊरक यांची "प्रोटोटाइप प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट" विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत प्रा. एस. ए. जेऊरकर यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणि मार्केट सर्वे मधून जे काही समस्या येतील ते कसे सोडवावे हे विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यशाळा फ्युचर डेव्हलपमेंटसाठी करेक्ट डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम टू द डेव्हलपमेंट ऑफ एनी प्रोसेस अँड इट्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आदी विषयावर व्याख्यान संपन्न झाली. काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विषयी विस्तृत माहिती जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत प्रा. जेऊरकर यांनी सविस्तर उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यशाळेचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. समाधान माळी, विशाल नवले, विजय नवले, धनाजी केवटे सह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.