जळगाव प्रतिनिधी
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन इंडिया दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँन्टी करप्शन कमिटी, महाराष्ट्र यांना जनसहयोग सेवाभावी संस्थांच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
या या सेवाभावी संस्थेचे संयोजक मोईन खान यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मण लटपटे प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया (सामाजिक क्षेत्र) यांना निसुल्क समाजसेवा करणारे श्री लटपटे यांना सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २८ वर्षापासुन कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतिने स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत मोहत्सवा निमित्त महाराष्ट्रभुषण पुरस्कार या 2023चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये SSc.व Hsc या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व १०१ गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले व मराठवाड्यातले सामाजिक क्षेत्रातील काम करणारे पत्रकार, वैद्यकीय, कला, आशा, पोलीस जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या या 40 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा मा.खासदार.डॉ. फौज खान, अँड अशोक सोनी ,पोलीस निरीक्षक परभण ईगेवाड , श्री विठ्ठल रामबावरे ,मा.बशीर खान आदि मान्यवर उपस्थित होते.