विद्यापीठाने घेतली प्राध्यापकांच्या संशोधनाची दखल
पंढरपूर प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथील सिव्हिल इंजिनिरिंग विभागातील प्राध्यापकांच्या संशोधांनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटीने 2 लाख 60 हजार रूपयांचा निधि पुढील संशोधांनासाठी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्या मार्गदशनाखाली कर्मयोगीतून १२ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3 प्रस्ताव शेवटच्या फेरीमध्ये निवडण्यात आले. त्यातून प्रा. अनिल बाबर व प्रा. अमरजीत देवकर यांच्या “स्टॅबिलायझेशन ऑफ ब्लॅक कॉटन सॉइल बाय युसिंग टेराझाईम” या प्रस्तावासाठी हा निधि मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती देताना डॉ. एस पी पाटील म्हणाले की विद्यापीठाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशन च्या अंतर्गत हा निधि प्राप्त झाला असून काळ्या मातीमध्ये तयार केलेला रस्ता हा काही काळाने खचतो. या मूलभूत सामाजिक प्रश्नावर महाविद्याल्यामधील सिव्हिल इंजिनिरिंग विभागातील प्रा. अनिल बाबर व प्रा. अमरजीत देवकर यांनी संशोधन करून हा काळ्या मातीतील रस्ता कसा खचणार नाही यावर एक संकल्पना सादर केली होती ती संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्या करिता विद्यापीठाने 2 लाख 60 हजार रूपयांचा निधि उपलब्ध करून दिला आहे. या संशोधांनामुळे रस्त्यांचे स्थिरीकरण उत्तम प्रकारे होणार आहे.
याबाबत बोलताना महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात म्हणाले की विद्यापीठामद्धे आलेल्या २४१ प्रस्तावामद्धे कर्मयोगीच्या या प्रस्तावाची निवड झाली असून हे महाविद्यालय व रिसर्च अँड डेवलपमेंट विभागाचे हे यश आहे. यापुढे भविष्यामध्ये ही संशोधांनासाठी प्राध्यापकांना प्रेरित करून समाजपोयोगी संशोधन महाविद्यालयामर्फत केले जाणार आहे असेही त्यांनी संगितले.
चेअरमन श्री. रोहन परिचारक यांच्या मार्गदशांनाखाली गेल्या काही वर्षात कर्मयोगी इंस्टीट्यूट चा नावलौकिक वाढला असून बहुतांश पालकांच्या पसंतीस महाविद्यालय पात्र ठरत आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक यांनी प्रा. अनिल बाबर व प्रा. अमरजित देवकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.