कोल्हापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र शाखेच्या वतीने कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नानासाहेब पाथरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लातूरचे श्री.महेश ढवळे,कार्याध्यक्ष नागपूरचे श्री.प्रमोद कोरमकर,सचिव जयसिंगपूरचे श्री.महादेव खटावकर,कोषाध्यक्ष श्री. पांडुरंग दाभोळे,संघटक जळगावचे श्री.मनोज भांडारकर,सहसचिव परळी वैजीनाथचे श्री.कैलास धोकटे,प्रसिध्दी प्रमुख कडेगावचे श्री.संतोष मुळे,प्रश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री.दिनकर पतंगे,नांदेडचे प्रमुख श्री.नंदकुमार कोसवतवार,मुंबई प्रमुख श्री. प्रभाकर नानोट,कोकण विभाग प्रमुख श्री.पुरुषोत्तम मुळे,नागपूर प्रमुख सुरेंद्र सायखेडे इत्यादी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी 'वैष्णव विवेक ' या त्रैमासिकाचे अनावरण करण्यात आले.