शेळवे प्रतिनिधी
शेळवे कृषी विद्यालय शेळवे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळवे व प्राथमिक आरोग्य केंद्र शेळवे यांनी मिळून ९ वा जागतिक योग दिन साजरा केला.
योग गुरु अशोक ननवरे व शाहूराजे जाधव तसेच डॉक्टर मुसळे, एस पी पाटील यांनी योगासना विषयी माहिती देऊन विद्यार्थ्याकडून योगासने करून घेतली. विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे योगासने केली.
शेळवे कृषी विद्यालय शेळवेचे मुख्याध्यापक मोहन गाजरे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शांताराम गाजरे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे व जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक ,आरोग्य कर्मचारी बापू बाबर उपस्थित होते.शहजी गोफणे यांनी सर्वांचे आभार मानले.