पंढरपूर प्रतिनिधी
छोट्या अनाधिकृत शाळांवर कारवाई पण दादर येथील नामांकित आय ई एस संस्थेकडे आय ई एस ईंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कुलला प्रथम आरटिई मान्यता नसताना आणि शाळे विरुद्ध कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी गेले दिड वर्षे तक्रार करुन पाठपुरावा करत असताना देखील या शाळेला प्रथम सर्व मन्यता सोडून थेट २०२२-२०२५ पर्यंत मान्यता दिली आहे.
एखादा शाळेची तक्रार सुरू असताना त्या शाळेला तक्रारीवर कारवाई पुर्ण झाल्या शिवाय मान्यता देता येत नाही पण आय ई एस भांडुप शाळेला बिएमसी शिक्षण विभागाने सर्व नियम ढाब्यावर बसवून मान्यता दिली, हि मान्यता अवैध आहे व यात सरळ सरळ भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते, म्हणून महासंघाचे नितीन दळवी हे सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई साठी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार करणार आहे.
आरटिई मान्यता शिवाय चालणाऱ्या २१८ खाजगी शाळेला पण बिएमसी शिक्षण विभाग व राज्य शिक्षण विभाग विभाग अशाच प्रकारे वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप महासंघाचे नितीन दळवी यांनी केला आहे आणि म्हणूनच या २१८ शाळांवर कारवाई करण्यासाठी विलंब होण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तीन महिन्याचा वेळ काढला.
धारावीतील मॉर्निंग स्टार् शाळेवर कारवाई हे सर्व शिक्षण विभागाचे नाटक आहे छोट्या शाळेवर कारवाई आणि मोठ्या शाळांना अभय हा सर्व कारभार सुरू आहे, आता याला आळा घालण्यासाठी न्यायालयातच शिक्षण विभागा विरोधात याचिका दाखल केल्या शिवाय पर्याय उरला नसल्याचे नितीन दळवी यांचे म्हणणे आहे.