सदाशिवनगर प्रतिनिधी
श्री शंकर सह साखर कारखाना लि. सदाशिवनगर 2023 - 24 गळीत हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणेसाठी प्रथम ॲडवान्स हप्त्याचे वाटप कारखान्याचे व्हा. चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या अडचणींचा काळ संपला असून कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे 5500 मे टन प्रति दिवस क्षमतेचे विस्तारीकरण काम जुलै महिन्यापासून चालू होणार असून सन 2024-25 गळीत हंगामामध्ये विस्तारीकरण काम पूर्ण होणार आहे.
यावेळी बोलताना ऍड कुलकर्णी म्हणाले सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर असून ऊस उत्पादकांनी पुरवठा केलेल्या ऊसाला भविष्यात चांगला दर देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध आहे. सन 2023-24 गळीत हंगामामध्ये सभासद, ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गळितासाठी पाठविणेचे आवाहन यावेळी व्हा चेअरमन ऍड मिलिंद कुलकर्णी पाटील यांनी केले.
या वेळी विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते - पाटील , कारखान्याचे संचालक सुनिल माने , कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख,शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड , जनरल मॅनेजर रविराज जगताप,खातेप्रमुख, विभागप्रमुख, तोडणी वाहतूक कंत्राटदार, सभासद, ऊस उत्पादक, व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.