सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'प्रयोग २के२३' प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.सचिन लढ्ढा, डायरेक्टर - इंनोव्हेशन,इंक्युबेशन अँड लिंकेज, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूर, ज्येष्ठ संशोधक व डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ.एस.एच.पवार , सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर सिंहगड कॅम्पस डायरेक्टर संजय नवले,सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुमेध पाठक यांनी या स्पर्धेचे प्रास्ताविक केले.
या प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेत एकूण ११५ विद्यार्थांच्या ग्रुपने प्रकल्प प्रदर्शनात प्रकल्प सादर केले.या प्रकल्प स्पर्धेमधील कॉम्प्युटर विभागातून विनर नागदत्त गज्जम अँड ग्रुप आणि रनरउप संकेत केदार अँड ग्रुप, इले्ट्रॉनिक्स विभागातून विनर प्रथम अडसूळे अँड ग्रूप आणि रनरउप यश सोनी अँड ग्रुप, इलेक्ट्रिकल विभागातून विनर नागनाथ हाक्के अँड ग्रुप आणि रनरउप शिवराज माळी अँड ग्रुप, सिव्हिल विभागातून निकिता कोळेकर अँड ग्रुप आणि अजय ढगे अँड ग्रुप, मेकॅनिकल विभागातून विनर चिन्मय झोड अँड ग्रुप आणि रनर उप आदर्श म्हणता अँड ग्रुप अशा प्रकारे प्रत्येक विभगातून विद्यार्थ्यांना पारितोषीक देण्यात आले.या प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेत महाविद्यालयातील सर्व फायनल इयर मधील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले होते.
तर सर्व विभागातून तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मिनी-प्रोजेक्ट प्रकल्प सादर केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायमा हाकीम व अपूर्वा एडके यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. एस. एस. शिरगण यांनी केले.
यावेळी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले,महविद्यालयाचे प्राचार्य शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे,डॉ. प्रदीप तपकिरे, डॉ.दत्तात्रय गंधमल,प्रा.विजय बिरादार,डॉ. विनोद खरात यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले