पंढरपूर प्रतिनिधी
सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे वाडीकुरोली येथील मतदान केंद्रावर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्यासोबत आईसाहेब व संस्था मतदारसंघातून बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेल्या मालनकाकू काळे कल्याण काळे यांच्या पत्नी संगीताताई काळे युवा नेते समाधान काळे व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी बोलताना विरोधकांचं नेहमीप्रमाणे डिपॉझिट जप्त होणार असून आपल्या विजयाचा शंभर टक्के खात्री असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.