सुरु असलेल्या मुख्य सीईटी परीक्षेला होत आहे याचा फायदा
पंढरपूर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर हे दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी दि.१६,२६,२८ एप्रिल, दि.०१ व ०४ मे असे एकूण पाच दिवस बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन मॉक सीईटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातुन एमएचटी- सीईटी २०२३ ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वेरी कॅम्पस मध्ये या पाच मॉक टेस्टस चे आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षांना संपूर्ण जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सीईटी च्या मुख्य परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी आवश्यक असणारी 'एमएचटी– सीईटी २०२३' ही परीक्षा दि. ९ मे ते दि. २० मे दरम्यान संपूर्ण राज्यभरात घेतली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एमएचटी-सीईटी २०२३ या मुख्य परीक्षेचा सराव व्हावा व विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक उत्तम गुण मिळावेत या दृष्टीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये दिवसातील दोन सत्रामध्ये शासनाच्या सीईटी प्रमाणे कॉम्प्यूटर बेस्ड सीईटी या सराव परीक्षांचे तब्बल पाचवेळा आयोजन केले होते. या पाचही सराव परीक्षांना विद्यार्थी व पालकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. स्वेरीने घेतलेल्या या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा अंदाज आला आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सराव परीक्षांचे आयोजन केले होते. दि.१६ एप्रिल रोजी मॉक टेस्ट क्र.१ झाली. दि. २६ एप्रिल रोजी मॉक टेस्ट क्र.२, मॉक टेस्ट क्र.३ दि.२८ एप्रिल २०२३, मॉक टेस्ट क्र.४ ही १ मे रोजी झाली. यानंतर देखील विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार दि. ४ मे रोजी सराव परीक्षा क्र.५ घेण्यात आली. या पाचही सराव परीक्षांमध्ये सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यातून सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्टेट सीईटी सेल कडून घेतली जाणारी मूळ परीक्षा ही कॉम्प्युटरच्या आधारे घेतली जात असल्याने बऱ्याच वेळा सरावा अभावी विद्यार्थ्यांची धांदल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सराव परीक्षांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेणे आवश्यक असते. प्रत्येक वेळेस आलेल्या विद्यार्थ्यांना स्वेरीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी स्वेरीच्या स्थापनेपासुनच्या यशाचा आलेख सादर केला.
यामध्ये ‘स्वेरीने विद्यापीठीय परीक्षांमध्ये राखलेली उत्कृष्ट निकालाची परंपरा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे ट्रेनिंग व नोकरीच्या संधी, ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन, स्वेरीतील पात्र अभ्यासक्रमांना असलेले एनबीएचे मानांकन, संशोधन क्षेत्रात घेतलेली उत्तुंग झेप, 'स्वेरी' मध्ये विविध अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांसोबत सुमारे ५० हून अधिक सामंजस्य करार, स्वेरीतील सुमारे २९ एवढी पीएच.डी.धारक प्राध्यापक संख्या, सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त कॅम्पस, उत्कृष्ट क्रीडा सुविधा’ आदी सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली.
या सराव परीक्षांचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वेरीचे विशेष आभार मानले. या सराव परीक्षांसाठी प्रवेश प्रक्रिया विभागातील प्रा.योगेश सुरवसे, प्रा.उत्तम अनुसे, प्रा.अविनाश पारखे, प्रा.पोपट आसबे, प्रा.प्रज्ञा भुसे, प्रा.चेतन जाधव यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भात अधिक माहीतीसाठी मोबा.नं.– ८९२९१००६१३ व ९५९५९२११५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.