चिंचणी प्रतिनिधी
BOSCH इंडिया पुणे या कंपनीचे एमडी अविनाश चिंतावार यांनी काही दिवसापूर्वी चिंचणी शाळेला भेट दिली होती. यावेळी त्यांनी चिंचणी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासक्रमाविषयी माहिती समजून घेतली.
यावेळी त्यांनी कंपनीच्या सीएसआर मधून या शाळेला टॅब(लॅपटॉप) भेट देऊ असे सांगितलं होते.आज कंपनीकडून एचआर विजय पाटील, पल्लवी कदम,सुरज जाधव यांनी 18 टॅब(लॅपटॉप ) अंदाजे 255000/- किमंतीचे व चित्रकला साहित्य भेट दिले.यावेळी चिंचणी ग्रामस्थ व जि. प. प्रा. शाळा चिंचणी यांच्या वतीने लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला होता.
यावेळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे,उप अभियंता भिमाशंकर मिटकरे, कृष्णा गोरे ,ग्रामसेवक मच्छिंद्र जाधव, सहशिक्षक जालिंदर गायकवाड चिंचणी गावातील स्त्री/ पुरुष शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कंपनीचे एचआर विजय पाटील म्हणाले की BOSCH कंपनी चे जगभरातील 184 देशांमध्ये काम असुन यामध्ये जवळपास 25 लाख कामगार काम करतात. या कंपनी च्या सीएसआर मधून अनेक ठिकाणी समाजउपयोगी कामे केली जातात. आज चिंचणीच्या शाळेला त्याचाच भाग म्हणून टॅब भेट देण्यात येत आहेत. ही मुले देशाचं भवितव्य असून ही जगतिक आधुनिकीकरणाशी स्पर्धा करण्यासाठी तयार असली पाहिजेत.
भविष्य काळामध्ये या गावातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस आहे. यावेळी गावडे साहेब म्हणाले की, आमच्या विभागामार्फत गावातील सुशोभीकरण, प्रशिक्षण केंद्र, रस्ते, स्विमिंग पुल, असा संपूर्ण पर्यटन विकास आराखडा तयार केला असून लवकरच त्याला शासनाकडून मान्यता मिळेल.
यासाठी या विभागाचे आ. बबनदादा शिंदे व आ.सुभाष बापू देशमुख यांचे सातत्याने प्रयत्न आहेत.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहन अनपट यांनी तर सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले.