उदय वाघवणकर - मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील स्वप्निल फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, मुलांना खाऊ वाटप, शूज, विविध स्पर्धांचे आयोजन यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.नुकतेच या संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
जुन महिन्यात जेव्हा शाळा पुन्हा सुरू होतील तेव्हा पालघर येथील पाटीलपाडा शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.भविष्यात पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये संरक्षण भिंत, प्रसाधनगृह, स्वयंपाकघर यांसारख्या अनेक महत्वाच्या व गरजेच्या सुविधा ही संस्था मुलांसाठी करणार आहे.
०९ फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ह्या संस्थेच्या प्रमुख शिल्पा सावंत आहेत.समाजोपयोगी कामे करत असताना स्वप्निल चव्हाण व इतर मित्रमंडळींचे सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळत असते.